विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक बुधवारी (दि.२७): कृषिमंत्री ना.भुसे अकोला येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार सहभागी


अकोला दिनांक २५(जिमाका)- खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा बुधवार दि.२७ रोजी होणार आहे. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे राहणार आहेत. बुधवार दि.२७ रोजी सकाळी साडेआठ वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते आढावा घेतील. या आढावा बैठकीत ना. भुसे हे अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. ही बैठक संपल्यावर सकाळी १० वाजता ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन