आतापर्यंत ११ कोटी १७ लाख रुपयांच्या निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर


अकोला दिनांक २४(जिमाका)- जिल्ह्यात शेतकरी गटांची चळवळ चांगलीच जोम धरत असून या चळवळीने  कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात ‘एकमेका सहाय्य करु’ चा अवलंब करीत आतापर्यंत ११ कोटी १७ लाख पाच हजार ८४० रुपयांच्या कृषि निविष्ठा ह्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचविल्या आहेत. तर ह्याच लॉक डाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  १० कोटी २९ लाख रुपयांचा शेतीमाल (फळे, भाजीपाला) शेतकरी गटांमार्फत विकी केला आहे.
                           कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेले शेतकरी गट या चळवळीचे केंद्रबिंदू ठरले आहेत. हे गट आता शेतीच्या उत्पादन ते विक्री ही साखळी विकसीत करीत आहेत.  जिल्ह्यातील २५३ शेतकरी गटांनी  आतापर्यंत  ११ हजार २६२ शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच चार कोटी ५१ लाख १४ हजार  ६१५ रुपये किमतीचे  २७३३.७८  मेट्रिक टन खत पोहोच केले. तसेच  सहा कोटी ६५ लाख ९१ हजार २२५ रुपये किमतीचे ८९२७.५ क्विंटल  बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले.  असे आतापर्यंत एकूण ११ कोटी १७ लाख पाच हजार ८४० रुपयांच्या कृषि निविष्ठा पोहोचविल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  मोहन वाघ यांनी दिली आहे.
१० कोटी २९ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री
                        जिल्ह्यातील शेतकरी गटांनी याच लॉकडाऊनच्या काळात तब्बल १० कोटी २९ लाख रुपयांची उलाढाल करुन कृषि उत्पादित माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचविला.  या शेतकरी गटांनी जिल्ह्यात ७२८ मेट्रीक टन, जिल्ह्या बाहेर २२४५ मेट्रिक टन तर परराज्यात १८८५ मेट्रिक टन  इतका शेतीमाल पाठवला.  या मालाची किंमत १० कोटी २९ लाख रुपये इतकी झाली आहे. या मालाच्या विक्रीसाठीजिल्ह्यात ९३ ठिकाणी थेट विक्रीची केंद्र सुरु करण्यात आली अशी माहितीही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी दिली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ