उगवा येथील आदिवासी मजूर परतले आपल्या गावी २१ जणांच्या प्रवासाची प्रकल्प कार्यालयाने केली व्यवस्था


अकोला,दि.१८(जिमाका)-   लॉकडाऊन कालावधीत २१  स्थलांतरीत आदिवासी मजुरांना  आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या  मदत कक्षामार्फत आपल्या गावी परत पाठविण्यात आले. प्रकल्प कार्यालयाने प्रवासाची सर्व व्यवस्था करुन दिली.  हे मजूर रविवारी (दि. १७) आपल्या नांद्रे ता. शहादा जि. नंदुरबार येथे रवाना झाले.
 लॉकडाऊन कालावधीत राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत आदिवासी मजुरांसाठी  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, अकोला येथे मदत कक्ष स्थापन केला होता.  या कक्षास उगवा ता. अकोला येथे २३ स्थलांतरीत आदिवासी मजूर अडकले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी अकोला व जिल्हाधिकारी नंदुरबार या कार्यालयांच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यात आल्या. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  दोन मजूर हे स्वतःच्या वाहनाने रवाना झाले तर उर्वरित २१ जणांना एस. टी. बसची व्यवस्था करण्यात आली. या प्रवाशांत १७ प्रौढ व्यक्ती तर पाच लहान मुले होती. या मजुरांना नेण्यासाठी व्यवस्था करण्यात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प कार्यालयाचे ममता विधळे, अरविंद इंगोले. शैलेश वानखडे, मदन इंगोले, निलेश घायल यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ