आधारभूत किंमत धान्य खरेदीः जिल्ह्यात सात केंद्रांना मान्यता


अकोला,दि.१५(जिमाका)-  आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात भरडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडील धान्य विकता यावे यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली आहे.
यात
१)अकोला तालुका- अकोला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम अकोला.
२) बार्शीटाकळी- बार्शी टाकळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम बार्शी टाकळी.
३) पातुर- पातुर तालुका तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम पातुर.
४) बाळापूर- बाळापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम बाळापूर
५) अकोट- अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम अकोट
६) तेल्हारा- तेल्हारा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम तेल्हारा.
७) मुर्तिजापूर- मुर्तिजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- शासकीय गोदाम मुर्तिजापुर.
तर धान्यांची आधारभूत किंमत याप्रमाणे आहे,
ज्वारी संकरीत  २५५० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी मालदांडी २५७० रुपये प्रतिक्विंटल, बाजरी २००० रुपये प्रतिक्विंटल,  मका १७६० रुपये प्रतिक्विंटल,  रागी ३१५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे आहे.
वरील प्रमाणे खरेदी केंद्र सुरु करुन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अहवाल पाठवावा असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ