कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश


अकोला,दि.१४(जिमाका)-  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी   जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात आणणे व  प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना  सेवा सुविधा पुरविणे याबाबत प्रशासनाला दिलेला कृती आराखडा  दिला असून त्यानुसार कारवाई करुन  प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.
१.बैदपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, माळीपुरा या प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा Swab घेण्याची कार्यवाही करण्यात यावी व याबाबत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.
२.बैदपुरा,खैर महंमद प्लॉट ,माळीपुरा  या भागात वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहीजेत त्यासाठी  फिरता दवाखाना (फिरतेवैद्यकीय वाहन ) ठेवण्यात यावे संपर्काकरीता एक मोबाईल क्रमांक देऊन मोबाईलवर प्राप्त माहीतीनुसार घरपोच वैद्यकीय सेवा देण्यात याव्या.
३. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये.
४.अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रातील विविध आवश्यकता जाणुन घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी.
५.निराधार योजनेच्या माध्यमातुन लोकांना पेन्शन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातुन मिळणारे पेन्शन बाबतचा निधी खातेधारकांच्या घरपोच देण्याचे नियोजन जिल्हा व्यवस्थापन अग्रणी बँक यांनी नियोजन तयार करण्यात यावे.
६.पुणे - मुंबईवरून आलेल्या लोकांची यादी व इतर ठिकाणावरुन आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात यावी. पुणे- मुंबई वरून आलेल्या व्यक्तींना १४ दिवस शाळेत राहण्यासाठी व्यवस्था करावी व त्यांचे भोजन सबंधित व्यवस्था करण्यात यावी. याबाबतचे नियोजन जिल्हा परीषद अकोला यांनी करावी.
७.कोरोना बाधित रुग्णाच्या Swab ची तपासणी वेळेवर करण्यात यावी. Swab तपासणी प्रक्रिया प्रलंबित राहु नये याबाबत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांनी आवश्यक ते नियोजन करावे. तसेच जिल्हा शल्य
चिकीत्सक यांचे कडे येणाऱ्या विविध मशिन त्वरीत कार्यान्वीत करण्यात यावे.
८.घरपोच धान्य वितरीत करण्याचे नियोजन करण्यात यावे. धान्य नागरीकांना सुरळीतपणे धान्य मिळण्याचे अनुषंगाने प्रती १०० कार्डधारकाप्रमाणे एका समन्वय करणाऱ्या व्यक्तीची नेमणुक करण्यात यावी. याबाबत कार्डधारकाला माहिती होईल याकरीता लाउडस्पीकर व  पत्रकाच्या सहाय्याने जनजागृती करावी.
९.कंटेनमेंट झोनमध्ये शिवभोजन थाळीची आवश्यकता असल्यास याबाबत झोन अधिकारी यांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळवावे. त्यानुसार अॅटोव्दारे त्या भागात शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात यावी. मोबाईल व्दारे Online बुकींग घेऊन शिवभोजन थाळी सदर भागात उपलब्ध करण्यात यावी.
१०.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्या बाबतची कारणे शोधून कार्यवाही करण्यात यावी.
११.कोरोना विषाणु विविध आरोग्य विषयक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कडून देण्यात आलेला निधी तात्काळ खर्च करण्यात यावा. आवश्यक साधनसामुग्री व औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबत नियोजन करण्यात यावे.
१२. कोरोना विषाणु च्या अनुषंगाने शहरी भाग ,ग्रामिण रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आवश्यक साधनसामुग्री व औषधे आवश्यकते नुसार उपलब्ध करण्यात यावेत. याबाबत निधीची आवश्यकता असल्यास निधीची मागणी करण्यात यावी.
१३. भाजीपाला ,दुध ,किराणा कुटुंबामध्ये घरपोच मिळेल याकरीता विशिष्ट व्यक्ती नेमुन त्या व्यक्ती मार्फत सदर साहीत्य घरोघरी पोहचविल्या जाईल.याबाबत महानगरपालिका आयुक्त यांनी नियोजन करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ