५३ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.३१ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ५३अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४२ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर  नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान काल (दि.३०) रात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५२८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५००९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२६० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९८६ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४६७९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५८१ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ११ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात  हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट,  फिरदौस कॉलनी, जुनेशहर,  तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
आज सायंकाळच्या अहवालात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दोघांचा मृत्यू
 दरम्यान काल रात्री दोन जण उपचार घेतांना मयत झाले आहेत. त्यात एक व्यक्ती संताजीनगर सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती  दि.२७ रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील  असून हा व्यक्ती दि.२६ रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.
नऊ जणांना डिस्चार्ज
आज दुपारून नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले. त्यात चार महिला व पाच पुरुष असून ते गोकुळ कॉलनी, फिरदौस कॉलनी,  न्यू खेतान नगर कौलखेड, रेल्वे स्टेशन,  अशोक नगर अकोट फैल,  खदान, हरिहरपेठ, गायत्री नगर , मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहेत.
११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५८१  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३२ जण (एक आत्महत्या व ३१ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज नऊ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४३२  झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
पाच प्रतिबंधित क्षेत्र व्यपगत
 कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्यामुळे  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले पाच भागांचे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आदेश अकोला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी व्यपगत केले आहेत. शंकरनगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, शिवनी व शिवर या पाच भागांचा त्यात समावेश आहे. गेल्या २८ दिवसांत तेथे नवीन रुग्ण न आढळल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र व्यपगत केले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ