जिल्ह्यात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ८ कोटी ७० लक्ष रुपये खर्च

अकोला दि.३०(जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध  अकोला जिल्ह्याला  विविध उपचार सुविधा व उपाययोजना करण्यासाठी  तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी  शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आपत्ती प्रतिसाद निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून  १० कोटी रुपयांचा निधी  उपलब्ध करण्यात आला असून आता पर्यंत जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी त्यातील ८ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे.
 याबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,  आपत्ती प्रतिसाद निधी  अंतर्गत जिल्ह्याला  ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व तहसिलदार व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या यंत्रणांना वितरीत करण्यात आला. या निधीतून यंत्रणानिहाय खर्च याप्रमाणे- जिल्हा शल्य चिकित्सक १ कोटी ५ लाख रुपये, महानगरपालिका अकोला ४० लाख रुपये,  जिल्हा पोलीस अधिक्षक पाच लाख रुपये, सर्व तहसिलदार यांनी मिळून  ४० लाख रुपये,  आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी २० लाख रुपये  असा एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यातून विविध सुविधा व तातडीच्या उपाययोजना निर्माण करण्यात आल्या.  या सर्व बाबी मदत व पुनर्वसनाशी  निगडीत  आहेत.  या निधीतील  एक कोटी ३० लाख रुपयांचा निधी अद्याप शिल्लक आहे.
या सोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  २०१९-२० अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक  अकोला यांना  औषधी, साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, उपजिल्हा रुग्णालयांसाठी  १ कोटी ७३ लाख  ८१ हजार रुपये,  जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला यांना ३ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपये तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना  एक कोटी ६४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून या सर्व यंत्रणांनी  हा सर्व निधी  म्हणजे सात कोटी  रुपये खर्च ही केला आहे. या शिवाय आगामी आर्थिक वर्षासाठी (सन २०२०-२१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रसामुग्री व साधनांच्या खरेदीसाठी  ६२ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीला  प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून  त्यापैकी २० लाख रुपये वितरीत करण्यात आले असून त्यातील सहा लाख रुपये खर्चही झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ