खेळाडू क्रीडागुण सवलत प्रस्ताव दि.१३ पर्यंत मागविले


अकोला,दि.(जिमाका)- इयत्ता १० वी व १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे  गुणवाढीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना विहित नमुन्यात सादर करावयाचे असतात. ते यंदाच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सादर होऊ शकले नाहीत. तथापि यासंदर्भातील शासन निर्णयानुसार इयत्ता  १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचे गुण सवलतीचे प्रस्ताव शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी  येत्या बुधवार दि.१३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे दुपारी चार वाजेपर्यंत आणावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना