सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदीबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



अकोला,दि.१७(जिमाका)- जिल्ह्यात भारतीय कापुस निगम (CCI) तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल,याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर भेटी देऊन सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याच्या दृष्टीने आढावा घ्यावा व अहवाल सादर करावा,असे आदेश  शनिवारी (दि.१६) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रभाव रोखण्यासाठी
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.संचारबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना कापुस विकता आला नाही. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापपर्यंत कापुस शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतीय कापुस निगम (CCI) अंतर्गत सद्यस्थितीत कापुस खरेदी प्रक्रिया सुरु असुन उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागातील कापुस खरेदी केंद्रावर भेटी देण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांनी कापुस विकण्याचे अनुषंगाने ऑन लाईन नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचा संपुर्ण कापुस खरेदी होईल,याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन अहवाल सादर करावा,असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी (दि.१६) निर्गमित केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ