१७६ अहवाल प्राप्तः ३७ पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू


अकोला,दि.१७ (जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३९ अहवाल निगेटीव्ह तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २५७ झाली आहे. मुर्तिजापुर येथील एक व्यक्ती मयत झाला असून आज सकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २५५१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २४१४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २१५७ अहवाल निगेटीव्ह तर २५७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  १३७ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण २५५१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २३३०, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१९३ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २१५७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २५७ आहेत. तर आजअखेर १३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ३७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १७६ अहवालात १३९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या  ३२ रुग्णात १० महिला व २२ पुरुष होते.  त्यात एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार, आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन,अकोट फ़ैल-तीन तर मुर्तिजापूर,आगरवेस,बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी  आहेत. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या पाच जणांपैकी तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोट फ़ैल व डाबकी रोड येथील रहिवासी आहेत.
एकाचा मृत्यू
 दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मयत असून तो दि.१३रोजी मयत झाला आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ४८ वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.
१७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज १७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यातील १२ जणांना घरी तर उर्वरित  पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  घरी सोडण्यात आलेल्या  १२ जणांपैकी  पाच जण माळीपुरा येथील, तीन जण मोहम्मद अली रोड येथील तर खंगनपुरा,  न्यु भीमनगर, अकोट फैल, गुलजारपुरा  येथील प्रत्येकी एक जण आहेत. तर ज्या पाच जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे ते पाचही जण तारफैल भागातील रहिवासी आहेत.

१२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत  २५७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. आज रविवार दि.१७ रोजी  १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११७ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २४६२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १६४३ गृहअलगीकरणात तर पाच जण संस्थागत अलगीकरणात्र  असे १६४८ जण अलगीकरणात आहेत. तर ६८१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ