पालकमंत्री ना.बच्चू कडू यांची मुर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालयास भेट


अकोला,दि.१२(जिमाका)-राज्याचे जलसंपदा  व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, शालेय शिक्षण, महिला व बालविकास कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी मुर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालय येथे भेट देवून कोरोना विलगीकरण कक्ष व  कोरोना  कक्षाला भेट दिली. यावेळी कोरोना विलगीकरण मध्ये असलेल्या व्यक्तीची भेट घेवून त्यांची विचारपुस करून त्यांना धीर दिला. यावेळी उपजिल्हा  रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र  नेमाणेडॉ. विजय वाडेकर, डॉ. धनंजय चिमनकर व विलगीकरण, वार्ड इंचार्ज हर्षा मानेकर   तसेच मुर्तिजापुरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांची उपस्थिती होती. कोरोना बाधितांच्या उपचाराची सुविधा म्हणून उपजिल्हा  रूग्णालय पुर्णत: सज्ज असावे, त्यासाठी त्यांनी पाहणी केली. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या  प्रत्येक  रूग्णाला सौजन्याची वागणूक देवून त्यांच्या मनातली  भिती घालवण्याच्या सल्ला  पालकमंत्री ना.कडू यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व  कर्मचारी यांना दिला. त्यांनी यावेळी उपजिल्हा रूग्णालयाची पाहणी करून रूग्णाची आस्थेने विचारपूस करून त्यांना धैर्य दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ