अकोल्याच्या नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे-केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे: दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाप्रशासनाचा आढावा


अकोला,दि.२८(जिमाका)- जिल्ह्यात कोविड बाधीत रूग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री ना. संजय  धोत्रे यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  जिल्हा प्रशासनाशी  संवाद साधला. यावेळी  महापौर  अर्चना मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनास सुचना केल्या की,  रुग्ण संख्या जादा असलेल्या भागात लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात यावे, प्रतिबंधीत  क्षेत्रातील  नागरीकांसाठी दुध व भाजीपाला तसेच मेडिकल  सारख्या जीवनावश्यक वस्तुंचा सुरळीत राहिल अशी व्यवस्था ठेवावी. आवश्यकता भासल्यास  खाजगी डॉक्टर्स व स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश दिले.
अकोला येथे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थितीनुसार  नागरिकांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे. ग्रामीण भागात  इतर राज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून  त्यांना  जिल्हा परिषदेच्या शाळेत  अलगीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. 
शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयात  कोविड संसर्गित रूग्णांना चांगली उपचार व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक  कर्मचारी अधिकारी तसेच नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे असे आवाहनही  राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ