विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा


अकोला,दि.२२ (जिमाका)-  अमरावती  विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्या अनुषंगाने करण्यात आलेले लॉकडाऊन, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज एका बैठकीत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अष्टपुत्रे,  डॉ. शिरसाम,  डॉ. अंबोरे,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी  डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या, वाढते मृत्यू याबाबतची कारणे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपलब्ध मनुष्यबळ व उपचार सुविधा यांचा आढावा घेतला. आवश्यकता भासल्यास अन्य जिल्ह्यातून वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी अनुमती  दर्शविली. त्यानंतर जिल्ह्यातील; विशेषतः शहरातील प्रतिबंधित क्षेत्र व त्यातील विविध सुविधा, त्या भागातील बाधितांची संख्या, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्काची साखळी शोधणे याबाबत त्यांनी आढावा घेतला. नुकत्याच शिथील निर्बंध करण्यात आलेल्या भागांमधील स्थितीबाबतही त्यांनी माहिती घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ