भेसळीच्या संशयावरुन पॅकेज ड्रिकींग वॉटर जप्त

 


अकोला,दि. 21(जिमाका)- अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे शेख सलीम किराणा शॉप, चोहट्टा बाजार ता.अकोट येथे लेबल दोष व पॅकेज ड्रिकींग वॉटरमध्ये भेसळ होत असल्याचे माहिती मिळाली. याआधारावर शेख सलीम किराणा शॉपवर अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी दुकानाची तपासणी करून पॅकेज ड्रिकींग वॉटर(ओरेण ब्रॅण्‍ड) एक लिटरच्‍या पॅक बॉटल व पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्‍ड ) 500 मिलीच्‍या 688 पॅकबंद बॉटल या पाण्‍याचे नमुने लेबल दोष व भेसळीच्‍या संशयावरून विश्‍लेषणा करीता घेतले व उर्वरित साठा पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्‍ड) एक लिटरच्‍या 80 पॅक बंद बॉटल किंमत 1 हजार 600 रुपये  व पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्‍ड) 500 मिलीच्‍या 688 पॅक बंद बॉटल किंमत 6 हजार 880 असा एकुण किंमत 8 हजार 480 रुपयेचा साठा जप्‍त केला. दोन्‍ही नमुने विश्‍लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविले असुन विश्‍लेषण अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर पुढील करण्‍यात येईल. ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक  आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार  स्टाफ नमुना सहायक भिमराव नरवणे यांच्या उपस्थितीत झाली.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ