अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन :तज्ज्ञांची समिती गठीत करणार- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





अकोला, दि.13(जिमाका)- तापमान वाढीचा उच्चांक गाठणाऱ्या अकोला शहर व जिल्ह्यातही तापमान कमी राखण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या पर्यावरणीय उपाययोजना राबवाव्या यासाठी लवकरच पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीची व्यापक मोहिम राबविण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातील वाढते व उच्चांकी तापमान ही साऱ्यांसाठीच चिंतेचा विषय असून याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी व पर्यावरणीय उपचार अंमलात आणण्यासाठी काय करता येईल? याबद्दल विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या मागणीनुसार, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे बैठक झाली.

या बैठकीस उपवनसंरक्षक के. अर्जून, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर,उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, हवामान केंद्राचे कार्तिक वानवे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे,  मिलिंद शिरभाते, ए.एस. नाथन, उदय वझे, संदीप वाघाळकर, डॉ. संतोष सुरडकर, शरद कोकाटे, प्रभाकर दौंड, विशाल बोरे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी आ. मिटकरी म्हणाले की, हा प्रश्न भावी पिढ्यांच्या हितासाठी सोडवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करणे आवश्यक असून सर्व घटकांनी सर्व भेद विसरुन एकत्र येणे काळाची गरज आहे.

त्यानंतर विविध मान्यवर तज्ज्ञांनी आपली मते मांडली. उपवनसंरक्षक अर्जून यांनी अकोला जिल्ह्यातील तापमानाच्या उच्चांकी वाढीमागील शास्त्रीय कारणे सांगितली. जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्याचे वृक्षआच्छादन वाढविणे गरजेचे असून वृक्ष रोपणाची व्यापक मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची उपलब्धता करणे, ई- क्लास जमिनींची माहिती घेऊन त्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करुन  लागवड करणे. लावलेल्या वृक्षांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतून  मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, भुजलस्तर उंचावणे, जलशयांची संख्या वाढविणे, झाडांचे संरक्षण करणे याबाबत दीर्घकाळ उपाययोजना कशा करता येतील, यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण तज्ज्ञांची समिती गठीत करुन दरमहा आढावा घेण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ