खरिप हंगाम 2022-23 पुर्व आढावा सभा; तालुकास्तरीय खरिप हंगामाचा घेतला आढावा

 




             अकोला दि.18(जिमाका)-  तालुकास्तरीय खरीप हंगाम 2022-23 पूर्वनियोजन आढावा आ. रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या बैठकीत विविध योजनेचा आढावा घेवून संभाव्य पेरणी क्षेत्रानुसार आवश्यक खत, युरिया व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्धतेबाबत आढावा घेतला.

            येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा सभा पार पडाला. यावेळी कृषि उत्तन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, कृषी विभागाचे कृषि अधिक्षक कांतप्पा खोत, जिल्हा परिषद सदस्यस ज्ञानेश्वर सुलताने, सुशांत बोर्डे, किरण मोहोड, तालुका कृषि अधिकारी शशिकांत जांभरुणकर, डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठचे जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

            खरिप आढावा सभेत आमदार रणधीर सावरकर यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्रात मदतनिधी वाटप, कृषि पिक विमा योजना, संभाव्य पेरणी क्षेत्र, शेतकरी अपघात विमा योजना,रोजगार हमी याजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, फळबाग लागवड कार्यक्रम इत्यादी बाबीचा सविस्तर आढावा घेतला. यावर्षी कापसाला मिळालेल्या भाव व कृषि सहायक यांच्या सर्वेक्षणानुसार  कापूस पेरणी क्षेत्र जास्त राहिल. त्याअनुषंगाने आवश्यक रासायनिक खते, युरिया व बियाणे इत्यादी बाबीची मुबलक उपलब्धता राहिल यांची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना पिक विमा अंतर्गत नुकसानीची रक्कम तातडीने मिळेल याकरीता कृषि विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याकरीता प्रयत्न करावा, अशा सूचना  रणधीर सावरकर यांनी यावेळी दिल्या.

            खरिप हंगाम सभेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि तालुका अधिकारी शंशिकांत जांभरुणकर यांनी केले. सुत्रसंचालन कृषि पर्यक्षक अनंत देशमुख व आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी प्रदीप राऊत यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ