प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; नोंदणीकृत लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

 

अकोला दि.5(जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 26 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून अद्यापह 28 हजार 696 लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न होणे बाकी आहे. एप्रिलनंतर सर्व हप्ते आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती आधार संलग्न करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची नोंदणी झाली नाही अशा लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावा. याकरीता जिल्हा अग्रणी बँकाचे व्यवस्थापकांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागीय बँक झोनल अधिकारी यांना निर्देश देऊन याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. एप्रिल 2022 च्या पुढे मिळणाऱ्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ