शेतकरी ते ग्राहक थेट विक्री; ‘फार्मर्स कट्टा’चे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण;

 




अकोला, दि.2(जिमाका)-  सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या रसायनमुक्त कृषि मालाला हक्काचे दुकान मिळाले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवून  ग्राहकांना विषमुक्त साहित्य खरेदी करता येईल. गुढीपाढवाच्या  मुहूर्तावर ‘फार्मर्स कट्टा’ चे लोकार्पण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज (दि.2) झाले.

       सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गट व कृषि विभाग पुरस्कृत  शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र ‘फार्मर्स कट्टा’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. फार्मर्स कट्टामधील अन्नधान्य, ताजी फळे,मसाले, लाकडी घाण्याचे नैसर्गिक पध्दतीने तयार केलेले शुद्ध तेल इत्यादी साहित्याची माहिती यावेळी घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, बार्शीटाकळी तालुका कृषि अधिकारी विलास वाशिमकर, सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गट कातखेडचे अध्यक्ष रुपेशजी पाटील लडे, सचिव वर्षा चव्हाण, सीताफळ महासंघाचे सचिव अनिल बोंडे, फार्मर कट्टाचे संचालक रमेश केने, महिला संचालक मंडळ आदि उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ