भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह: रक्तदान, ज्येष्ठनागरिक मेळावा,व्याख्यान

 अकोला दि.12(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.6 ते 16 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत असून यानिमित्त रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक मेळावा तसेच महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यान असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड  यांनी कळविले आहे.

रक्तदान शिबीर

याच कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी (दि.9) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, अकोला व पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रक्तपेढी विभाग, अकोला येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढीसंबंधी सर्व टीम, समाजकार्य महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संकेत काळे, प्रा. संदीप भोवते यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमास विशेष अधिकारी प्रदीप सुसतकर, अधीक्षक रेखा ठाकरे, सहाय्यक लेखाधिकारी योगेश दांदळे व सर्व कर्मचारी, समतादूत टीमसह बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांची उपस्थिती लाभली. या शिबिरात महाविद्यालयाच्या 16 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. सुत्रसंचालन मनिष चोटमल यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली गवई यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक मेळावा

शिवापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा  तसेच आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यात सकारात्मकता जागविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विशेष अधिकारी पी.डी. सुसतकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून फेस्कॉम संघटनेचे अध्यक्ष पांडे हे होते. सुत्रसंचालन मनिष चोटमल यांनी केले. प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक कुळकर्णी यांनी केले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी करण्याकरीता डॉ. गमे व त्यांची संपूर्ण टिम यांनी आरोग्य तपासणी करून कार्यक्रमास विशेष सहकार्य केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक उमेश वाघ यांनी केले.

महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यान

            पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी  येथे सोमवारी (दि.11) महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव गोरे तर प्रमुख व्याख्याता म्हणून अधिव्याख्याता तथा अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती, अकोला येथील सदस्य डॉ. स्वप्ना लांडे ह्या उपस्थित होत्या. डॉ. स्वप्ना लांडे यांनी महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणाबाबत विचार विस्तृतपणे मांडले. या कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. कविता कावरे, डॉ. बळीराम अवचार व नवनाथ बडे यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पंकज काळे यांनी केले. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, सामाजिक समता कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्रदिपजी सुसतकर, सहाय्यक लेखाधिकारी व समतादूत टिम चे सदस्य योगेश दांदळे तसेच सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ