गुटखा विक्रीःअडगाव बु. येथील दुकानदारास अटक

               अकोला दि.30(जिमाका)- अडगाव बु. ता. तेल्हारा येथे प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारावर शुक्रवारी (दि.29) छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईनुसार संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव बु.ता. तेल्हारा या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच 37 हजार 420 रुपयांचा प्रतिबंधित मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती या प्रमाणे की, शुक्रवार दि.29 रोजी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव बु.ता. तेल्हारा, जि. अकोला या दुकानाची तपासणी करून मालक सुनिल केशवराव परळकर यांचेकडुन केसर युक्त विमल पानमसाला हिरवे पाकीट 35 नग, सुगंधीत तंबाखु हिरवे पाकीट 35 नग, केसर युक्त विमल पानमसाला निळे पाकीट 65 नग, सुगंधीत तंबाखु निळे पाकीट 15 नग, वाह पानमसाला 125 नग, डब्ल्यु सुगंधीत तंबाखु 138 नग किंमत असा एकुण 37 हजार 420रुपये किमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुकान मालक सुनिल केशवराव परळकर(वय-33) रा.अंजनगांव रोड, गजानन मंदिराजवळ, गजानन नगर, अकोट, ता.अकोट, जि.अकोला, मुसा उर्फ अब्दुल मुसदीर अब्दुल नाजीक, रा. अडगांव बु।।, ता. तेल्हारा, जि.अकोला तसेच असलमखा सनाउल्लाखा, रा. अडगांव बु।।, ता. तेल्हारा, जि.अकोला यांच्या विरूद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम 26(2)(i) सह कलम 26(2)(iv) सह कलम 27(2)(e)(f) सह कलम 30(2)(a) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 59 व भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 नुसार हिवरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मुसा उर्फ अब्दुल मुसदीर अब्दुल नाजीक, रा. अडगांव बु।।, ता. तेल्हारा, जि.अकोला तसेच असलमखा सनाउल्लाखा, रा. अडगांव बु।।, ता. तेल्हारा, जि.अकोला हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी कारवाई केली, नमुना सहायक भिमराव नरवणे यांनी त्यांना सहकार्य केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ