प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी संस्थेची नेमणूक; प्रस्ताव मागविले

 

अकोला दि.20(जिमाका)- प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेश मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येणार असून त्यासाठी दि.22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता इच्छुक संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये  जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची (एसपीसीए) स्थापना करण्यात आली आहे.  तसेच पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिक कचरा व्यवस्‍थापन तसेच प्लॉस्टर ऑफ पॅरीसचा वापरास प्रतिबंध या आदेशांची अकोला जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावयाची आहे. त्यादृष्टीने प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर, प्लॉस्टर ऑफ पॅरीसचा वापर इ. मुळे प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेश मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करावयाची आहे. दंडनिय कारवाईतून प्राप्त झालेल्या निधीतून संबधित संस्था यांना भागीदारी तत्वानुसार मानधन अदा करण्यात येईल. इच्छुक संस्था यांनी आवश्यक माहितीसह बुधवार दिनांक 22‍ एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष एसपीसीए समिती  निमा अरोरा यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ