लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ;पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात विकासकामांचे भुमिपूजन

 













             अकोला दि.14(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते आज जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, महानगरपालिकांच्या नागरी क्षेत्रातील विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत ही विकास कामे होणार आहेत.

त्यानुसार, आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नगरपरिषद अकोट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  दिव्यांगांना फिरते विक्री केंद्रांचेही  वितरण करण्यात आले. अकोट नगर परिषदेचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16, संकल्प कॉलनी अकोट येथे पार पडला. या कार्यक्रमास आ. प्रकाश भारसाकळे, तहसिलदार निलेश मडके, नगर परिषद प्रशासन अधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, माविमच्या वर्षा खोबरागडे आदी उपस्थित होते. अकोट नगरपरिषदेस या योजनेअंतर्गत 12 कोटी 56 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून या निधीत अकोट नगर परिषद हद्दीतील एकही विकासकाम आता शिल्लक राहणार नाही,असे पालकमंत्री कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की, महापुरुषांनी नेहमीच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांच्याकडून आपण भारतीय आहोत हा विचार आपण शिकला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी तेल्हारा नगरपरिषदेतील  विकासकामांचा  शुभारंभ अकोट येथील सार्वजनिक वाचनालयातून ऑनलाईन पद्धतीने केला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. तेल्हारा नगरपरिषदेच्या हद्दीत या योजनेतून 1 कोटी 47 लक्ष रुपयांची कामे होणार आहेत.

त्यानंतर अकोला मनपा हद्दीत साईनगर प्रभाग क्रमांक 8 येथे 19 कोटी 56 लाख रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास मनपा उपायुक्त पंकज जावळे, क्षेत्रिय अधिकारी  दिलीप जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कडू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन केले, तसेच उपस्थित नागरिकांना शुभेच्छा ही दिल्या.

त्यानंतर बाळापूर नगर परिषदेच्या  हद्दीतील 12 कोटी 1 लाख 23 हजार 745 रुपयांच्या निधीतील कामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास तहसिलदार सैय्यद एहसानुद्दीन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

त्यानंतर बार्शी टाकळी  नगरपरिषद व मुर्तिजापूर नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचे भुमिपूजन त्यांनी केले. तसेच मुर्तिजापुर येथेही दिव्यांगांना रोजगारासाठी तिन चाकी ई- ट्रायसिकलचे वितरणही केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ