पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; रोजगार मेळाव्यात 57 पदांसाठी 147 उमेदवारांची प्राथमिक निवड


        अकोला,दि. 8(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात 57 पदांसाठी 147 उमेदवारांची  प्राथमिक निवड करण्यात आली असून पुढील फेरी संबंधीत नियोक्त्याच्या आस्थापनाव्दारे अंतिम निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

            पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र, वाडेगांव येथे 27 पदे, प्रज्ञा सोशल वेलफेअर अॅण्‍ड एज्‍यूकेशन सोसायटी अकोला येथे 20 पदे, जेम्‍बो मार्क लिंक प्रा.लि.अकोला येथे टेली कॉलर पदाचे  10 पदे असे एकूण तीन कंपनीत 57 पदांच्या भरतीकरीता 379 महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या. त्यापैकी 147 उमेदवारांची   प्राथमिक निवड करण्यात आली असून पुढील फेरी संबंधीत नियोक्त्याच्या आस्थापनाव्दारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथम परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ