उष्णतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

              अकोला दि.28(जिमाका)- भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्या संदेशानुसार शुक्रवार दि.29 ते सोमवार दि.2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत, अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*