औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था;गुरुवारी(दि.21) रोजगार भरती मेळावा

अकोला दि.18(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व स्किल कनेक्‍ट ग्‍लोबल प्रायव्‍हेट लिमीटेड, दिल्‍ली यांचे संयुक्‍त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अकोला येथे गुरुवार दि. 21 एप्रील रोजी विविध कंपन्‍यांमध्‍ये मशीनीष्‍ट, विजतंत्री, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्‍स, टुल अॅन्‍ड डायमेकर, कातारी, सिएनसी, मीलर, कोपा, जोडारी, यांत्रिक मोटारगाडी, डीझेल मेकॅनिक तसेच विविध व्‍यवसायातील आय. टी. आय. उतीर्ण प्रशिक्षणार्थ्‍यांना संबंधित कंपनीमार्फत रोजगार देण्‍यात येणार आहेत. ईच्‍छुक व पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार भरती मेळाव्‍यामध्‍ये सहभागी व्‍हावे. तसेच मंगळवार दि. 19 एप्रीलपर्यंत आपली माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अकोला येथे देण्‍यात यावी. मुलाखतीला येतांना बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे घेवुन यावे. तसेच अधिक मार्गदर्शनासाठी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंन्‍द्र व्‍दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे अशंकालीन प्राचार्य यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ