अकोला आरटीओ वायुवेग पथक विभागात अव्वल

 अकोला दि.13(जिमाका)– अमरावती विभागात अकोला आरटीओ अव्वल एप्रिल 2021 ते मार्च 2022 आर्थिक वर्षात अमरावती विभागामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांनी अंमलबजावणी कामकाजात प्रथम क्रमांक व राज्यात सातवा क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वायुवेग पथकाने वर्षभरामध्ये 1 कोटी 72 लाख 14 हजार रूपये दंड वसूल केला आहे. वायुवेग पथकाकडून 18 हजार 789 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मोटार वाहन कायद्यातील कलमांचा भंग करणाऱ्या वाहन धारक व चालकांना विविध 32 गुन्ह्याअंतर्गत दंड वसूल करण्यात आला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सन 2021-22 या आर्थिक वर्षात 1 कोटी 46 लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने उद्दीष्टपुर्ततेमध्ये 117 टक्के वसूली करून विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये सर्वात जास्त दंड मालवाहू वाहनातून भार क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करणाऱ्या म्हणजेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या 206 वाहनधारकाकडून 72 लाख 27 हजार इतका दंड वसूल केला. त्याखालोखाल वाहनांचे फिटनेस नसणाऱ्या 1567 वाहन धारकाकडून 15 लाख 39 हजार इतका दंड वसूल केला. 2698 चालकांकडे लायसन्स नसल्यामुळे 11 लाख 4 हजार 439 अवैध प्रवासी वाहतूक धारकाकडून 8 लाख 68 हजार दंड, पियुसी नसणाऱ्या 2732 वाहन धारकाकडून 8 लाख 86 हजार तर विमा नसणाऱ्या 2520 वाहन धारकाकडून 11 लाख 19 हजार 700 इतका दंड वसूल करण्यात आला त्याशिवाय हेल्मेट नसणे, वाहन चालवितांना मोबाईल वर बोलणे, सिट बेल्ट न वापरणे यांच्यावर सुध्दा कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट न वापरणे मोबाईल वर बोलणे चारचाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट चा वापर न करणे तसेच ओव्हरलोड वाहन चालविणे याबाबत दोषी असलेल्या 721 वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे.

या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांना मासिक उद्दीष्ट देऊन त्यांच्याकडून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करण्यात येते. शासनाच्या महसुलामध्ये या विभागाच्या महत्वाचा वाटा आहे. महसूल उद्दीष्ट पुर्तता करीत असतांना या विभागास अपघात तपासणी करणे, विविध तपासणी मोहीम राबविणे, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज व दैनंदिन कामकाज सांभाळून उद्दीष्ट पूर्ण केले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या कार्यकाळात या कार्यालयाने 138 टक्के इतकी महसूली उद्दीष्टांची पुर्तता केली. या कामासाठी या कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहा. मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी वृंद तसेच चालक यांनी परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ