संरक्षण क्षमता महोत्सव 2022; हरित व स्वच्छ उर्जा वापराकरीता विशेष मोहिम

 

             अकोला दि.19(जिमाका)-  पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटना,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण क्षमता महोत्सवनिमित्त हरित व स्वच्छ उर्जा वापराकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवार दि. 30 एप्रिलपर्यंत विविध उपक्रमाव्दारे इंधनावरील खर्चास आळा घालणे तसेच जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत जनजागृती व्हावी याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे,अशी माहिती ऑईल मार्केटींग कंपनीचे सहायक व्यवस्थापक तथा जिल्हा समन्वयक मनिष पाटेदार यांनी दिली.

            देशाच्या सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने संरक्षण क्षमता महोत्सवातर्गंत विविध उपक्रम राबवित आहे. या मोहिमेअंतर्गत इंधनावरील अपव्यय खर्चास आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जित हाणारे हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच 2070 पर्यंत निव्वळ शुन्य उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याकरीता सामान्य नागरिकापर्यंत जनजागृती व्हावी याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात उद्योगांसाठी तांत्रिक बैठका, सायक्लोथॉन, वॉकथॉन, शालेय विद्यार्थ्यांकरीता गटचर्चा, वादविवाद, भितिचित्र, वॉलपेंटीग, लेखलेखन, पत्रकार परिषद, व जिंगल्सव्दारे प्रसिद्धी इत्यादी माध्यमाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ