सामाजिक समता सप्ताहनिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

 


अकोला दि.11(जिमाका) -  समाजकल्याण आयुक्त तसेच महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याद्वारे दि. 6 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहनिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी कळविले आहे.

त्यानुसार, बुधवार दि. 13 रोजी राधा देवी तोष्णीवाल महाविद्यालय, अकोला येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक दिवसीय शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

या शिबिरात इ. 11 वी 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी /सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात्‍ शिकत असलेले विद्यार्थ्यांनी नमुद केलेल्या तारखेस व महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण ऑनलाईन अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे तसेच मुळ कागदपत्रांसह हजर रहावे. या दिवशी या समितीतील अधिकारी व कर्मचारी हे महाविद्यालयात हजर राहून अर्ज स्विकारतील तसेच वैधता प्रमाणपत्र देण्याची पुढील कार्यवाही करतील.

इ. 1112 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी ज्यांनी अद्यापपर्यंत  जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनीही  आपले परिपूर्ण ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रे व मुळ कागदपत्रासह शिबीरामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी केले आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ