झरीनाका येथे 24x7 पोलीस व वनविभागाचा संयुक्त चेकनाका ;जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

 अकोला, दि.12(जिमाका)- महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तेल्हारा येथील झरीनाका येथे पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करुन 24X7 संयुक्त चेकनाका बुधवार दि.13 पासून कार्यान्वित करावे,असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले. या आदेशात म्हटल्याप्रमाणे, झरीनाका चेकपोस्ट पासून झरी बाजार व दिवाण झरी, उमरशेवडी, चिचणी गाव व तलाई अंबा अपर्वा या परीक्षेत्रात  वनपरिक्षेत्र अधिकारी व पोलीस यांनी दैनंदिन पेट्रोलिंग करावी. या परिक्षेत्रातून  गोवंशाची कत्तल करण्यासाठी गाय, वळू, बैल यांची वाहतूक आणि निर्यात करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ