सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचा उपक्रम: पौष्टिक शालेय पोषण आहार मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक- पालकमंत्री बच्चू कडू

 







             अकोला दि.4(जिमाका)-  शालेय विद्यार्थ्यांना पौष्टीक पोषण आहार हा मुलांच्या शारिरीक व बौद्धिक विकासासाठी  आवश्यक आहे. सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेचे या क्षेत्रातील काम कौतुकास्पद  असून हा उपक्रम  संपूर्ण जिल्ह्यात राबवू, असे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांगितले.

            मुर्तिजापूर येथे पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे सभापती सम्राट डोंगरदिवे,  शिक्षण विभागाचे उपसंचालक शिवलींग पटवे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नगर परिषदेचे मुख्यधिकारी  विजय लोहकर, सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचे समन्वयक  संतोष अलाट, मनोज  गवई, जिल्हा समन्वयक अधीक्षक संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.

            या कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित मुलांना साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ मिक्सचे वाटप करण्यात आले.  उपस्थित विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल याकरीता प्रयत्न करु. तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्याने सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेमार्फत पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप सुरु झाले असून मुर्तिजापूर  नगरपरिषद असा उपक्रम राबविणारी पहिलीच नगरपरिषद असल्याबद्दल पालकमंत्री कडू यांनी कौतूक केले. 

मुर्तिजापूर नगरपरिषदेतील 14 शाळेत 1050 विद्यार्थ्यांना शालेय पौष्टीक आहार साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ पावडर वाटप करण्यात येणार आहे. ही पावडर दुधात मिसळून मुलांना द्यावी, असे सत्यसाई अन्नपूर्णा संस्थाचे राष्ट्रीय समन्वयक  संतोष अलाट यांनी या पावडरचे आहारातील महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयदीप सोनखासकर तर आभार प्रदर्शन राजेश भुगूल यांनी केले.

00000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ