कोविडःआरटीपीसीआर व रॅपिड अहवाल शुन्य, तीन डिस्चार्ज


अकोला दि.1(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 99 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले असून सद्यास्थितीत एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 00.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 371583 तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 367466 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 371583 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 322414 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आरटीपीसीआर ‘शुन्य’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972)आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 64014 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्ण शिल्लक नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन 82 चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह

जिल्ह्यात काल (दि. 31 रोजी) रॅपिड ॲन्टीजेनच्या 82 चाचण्या करण्यात आल्या. त्यात कुणाचाही  अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोला मनपा क्षेत्रात 51 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 31 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा एकूण 82 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ