भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम; महिला मेळाव्यात महिलांचे हक्क व अधिकाराबाबत मार्गदर्शन


अकोला,दि. 19(जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी  जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार शुक्रवारी(दि.15) मागावर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, अकोला येथे महिला मेळावा कार्यक्रमात महिलांचे हक्क व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

            सामाजिक समता कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर तर . प्रमुख पाहुणे गृहपाल श्रीमती चेडे, श्रीमती कुलकर्णी उपस्थित होते. प्रज्ञा ठाकरे यांनी महिला सक्षमीकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलासाठी केलेल्या कार्याचे माहिती देवून जीवनस्तर उच्चस्तरावर कसे नेता येईल या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.ठाकरे यांनी तर सुत्रसंचालन समता तायडे, व आभार प्रदर्शन वैशाली गवई यांनी केले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी व समतादुत सदस्य यांनी योगदान दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*