पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना


             अकोला दि.26(जिमाका)-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षात पारधी समाजाच्या विकासासाठी  विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यात 50 पारधी समाजाच्या शेतकरी लाभार्थ्यांना शेतीकरीता 100 टक्के अनुदानावर काटेरी तार कूंपनाच्या खरेदीकरीता अर्थसहाय्य, 50 पारधी समाजातील शिलाई मशिन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माहिलांना शिलाई मशीन खरेदीकरीता 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य तर 70 पारधी समाजाच्या युवकयुवतीना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व लायसन्स देणे, असे एकूण 170 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरीता पारधी किंवा फासेपारधी समाजाच्या जमातीच्या लाभार्थ्यांनी दि. 4  ते 13 मे दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे  कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. योजनेचा छापील अर्ज लाभार्थ्यांना विनामुल्य देण्यात येईल. तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाही यांची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ