‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण अकोला जिल्ह्याच्या 'डिजिटल राहुटी' उपक्रमाचा समावेश



अकोला,दि.22(जिमाका)- ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धे'चे पारितोषिक वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२१) करण्यात आले. यात अकोला जिल्ह्यातील डिजिटल राहुटी या उपक्रमाचा समावेश आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की,

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या 'डिजिटल राहुटी' या उपक्रमास ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत उत्कृष्ट कल्पना या गटात तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथी गृहात गुरुवारी पार पडले. या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले यांनी हा पुरस्कार स्विकारला.

अकोला जिल्ह्यास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानअंतर्गत सर्वोकृष्ट कल्पना गटात तृतीय पारितोषिक जाहीर झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोरोना काळात व्हिडीओ, टेलिग्राफी व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन  ग्रामीण व शहरी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना  विविध सेवा देणे, त्यामाध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे या नाविन्यपूर्ण संकल्पनेकरीता  पारितोषिक जाहीर झाले होते.   रोख रक्कम 20 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ