एकलव्य इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांची प्रवेश परिक्षा 5 जून रोजी


अकोला,दि.21 (जिमाका)-     आदिवासी विकास  विभागामार्फत एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात  शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची  दि. 5 जून रोजी स्पर्धा  परिक्षा  घेण्यात येणार  आहे. या परिक्षेसाठी दि. 5 मेपर्यंत  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत  विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

 या परिक्षेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलढाणा,  वाशिम  या जिल्ह्यातील  सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सन 2021-22  या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी मध्ये शिकत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील.  या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडुन भरून घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे दि. 5 मेपर्यंत सादर करावे.  या परिक्षेचे अर्ज  शासकीय आश्रम शाळेतील  मुख्याध्यापक व  प्रकल्प अधिकारी कार्यालय  यांच्याकडे विनामुल्य  उपलब्ध आहेत.  ही परीक्षा दि. 5 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी एक यावेळात  शासकीय आश्रमशाळा कोथळी ता. बार्शिटाकळी जि. अकोला व शासकीय आश्रमशाळा घाटबोरी ता. मेहकर जि. बुलडाणा येथे होणार आहे. तरी या परीक्षेस जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ व्हावे, असे आवाहन एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे  प्रकल्प  अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ