ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागात परवाना क्षेत्र स्टिकर लावणे बंधनकारक


अकोला दि.20(जिमाका) - संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा जिल्हा अकोला व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार  शहरात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या ग्रामिण परवाना ऑटोरिक्षा प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवावे. तसेच त्यावरील उपाययोजना म्हणून अकोला जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारक यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून          दि. 15 मे पर्यंत ऑटोरिक्षा वाहनाच्या आतील दर्शनी भागावर परवाना क्षेत्र स्टिकर (हिरवे- शहर परवाना व लाल-ग्रामीण परवाना) ऑटोरिक्षा संघटना अकोला यांचे मार्फत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ऑटोरिक्षा परवानाधारकांनी मंजूर परवाना क्षेत्रातच वाहन चालवावे. ग्रामीण परवाना दिला असेल त्यानी ग्रामीण भागात आणि  शहरी परवाना दिला असेल तर शहरी भागातच वाहन चालवावे. अन्यथा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोरिक्षावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ