नोंदणी व मुद्रांक विभाग; शास्तीच्या रक्कमांवर सवलत

अकोला दि.29(जिमाका)- मुद्रांक शुल्‍काच्‍या तुटीच्‍या भागावरील शास्‍तीची कपात करण्‍याकरीता महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांमधील दि. 31 मार्चपूर्वी नोटीस मिळाली आहे अशा प्रकरणावरील देय असणाऱ्या शास्‍तीच्‍या रक्कमांवर सुट देण्‍यात आली आहे. या योजनेचा जास्‍तीत जास्‍त नागरीकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्‍हाधिकारी दिलीप भोसले यांनी केले आहे.

योजनेतील अर्ज दाखल करण्‍याची मुदत दि. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 असेल. दि. 1 मे ते 31 जुलै  2022  या कालावधीसाठी दंड सवलत देय रकमेच्‍या 90 टक्‍के राहील, दि. 1 ऑगस्ट ते  30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी दंड सवलत देय रकमेच्‍या 50 टक्‍के राहील. योजनेचा अर्ज www.igrmaharashtra.gov.in या पोर्टलवर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. ऑनलाईन अर्जातील परिपूर्ण माहिती पोर्टलवर भरल्‍यानंतर त्‍याची छापील प्रत अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील, असे मुद्राक व नोंदणी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा