केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

 




             अकोला दि.19(जिमाका)- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आज सकाळी अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. मनपा महापौर अर्चना मसने, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर व अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटयार यांनी त्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. निलेश  अपार, तहसिलदार सुनिल पाटील आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. तसेच सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, राजेंद्र पाटणी, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल यांचीही यावेळी उपस्थिती होती. स्वागतानंतर श्री. राणे  पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार वाशिमकडे रवाना झाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा