सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गटाचा उपक्रम; ‘फार्मर्स कट्टा’चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज उद्धाटन

 

अकोला, दि.1(जिमाका)-  सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गटच्या माध्यमातून रसायनमुक्त शेतकरी उत्पादीत अन्नधान्य, फळे, मसाले इत्यादी साहित्य शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. गुढीपाढवाच्या  मुहूर्तावर येथील जवाहर नगर येथे ‘फार्मर्स कट्टा’ शाखा दोनचे शुभारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज (दि.2) होणार आहे.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे तर निमंत्रक तालुका कृषि अधिकारी विलास वाशिमकर, सातपुडा नॅचरल्स शेतकरी उत्पादक गट, कातखेडचे अध्यक्ष रुपेशजी पाटील लडे, सचिव वर्षा चव्हाण आदि उपस्थित राहिल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*