मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी आठ वा.

              अकोला दि.28(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा (दि.1 मे) जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ  लाल बहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे. रविवार दि .1 मे रोजी सकाळी आठ वाजता हा समारंभ होईल. राज्यभरात हा समारंभ एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार आहे. मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी सव्वा सात ते सकाळी 9 वा. दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी सव्वा सात वाजेच्या पूर्वी किंवा सकाळी 9 वा. नंतर करावा,असे शासनाचे निर्देश आहेत. अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7 वा. 10 मि. ध्वजारोहण समारंभ होईल. तर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ लाल बहादुर शास्त्री स्टेडियम  अकोला येथे सकाळी आठ वा. होणार आहे. शासनाच्या अन्य विभागांनी आपापल्या कार्यालयांचे ध्वजारोहणाचे कार्यक्रम शासनाच्या निर्देशानुसार आयोजीत करावे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ