महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6110 उमेदवारांची उपस्थिती

 





अकोला, दि.3(जिमाका)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा- 2021 ही परीक्षा जिल्ह्यातील एकुण 29 उपकेंद्रावर घेण्‍यात आली. या एकूण 29 उपकेंद्रावर 7622 परीक्षार्थींचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 6110 उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. तर 1512 उमेदवार अनुपस्थित होते.

                         या परीक्षेकरीता जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांच्या  मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्‍हणून काम पाहिले. तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, यांनी विशेष निरिक्षक म्हणुन काम पाहिले. परीक्षा सुरळीत व यशस्‍वीपणे पार पाडण्‍याकरीता समन्‍वय अधिकारी म्‍हणुन उपविभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार, उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, भुसंपादन अधिकारी विश्‍वनाथ घुगे, सहा. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसिलदार तेल्हारा संतोष येवलीकर,खरेदी अधिकारी बळवंत अरखराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सु. वि. गोहाड, तहसिलदार अकोला सुनिल पाटील, सहा संचालक स्थानिक निधि लेखा परिक्षण वि.अ.जवंजाळ, यांनी कामकाज केले. परीक्षा केंद्रांवर निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी प्रत्‍यक्ष भेटी दिल्‍या.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ