भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम;विविध स्पर्धाचे आयोजन

 

अकोला,दि. 8(जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी  जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार गुरुवारी(दि.7)  जिल्ह्यातील महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित विविध स्पर्धोचे आयोजन  करण्यात आले.

            या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा, प्रश्नमजुंषा अशा स्पर्धा गटनिहाय आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यापैकी उत्कृष्ठ निबंध लेखक व वक्तृत्व, लघुनाटय सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तज्ञ शिक्षकांमार्फत प्रथम, व्दितीय व तृतीय निवड करुन विभागीय स्तरावर  पाठविण्यात येणार.  त्यानंतर विभागास्तरावरुन उत्कृष्ठ  प्रथम, व्दितीय व तृतीय विजेता विद्यार्थ्यांची निवड करुन पुरस्कार देण्यात येईल.   

सामाजिक समता कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर, सहायक लेखाधिकारी योगेश दांदळे, प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर , समाजकल्याण निरिक्षक उमेश उगले, तसेच कार्यालयीन कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ