अन्न व्यावसायिकांनी फोस्कॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व इ मेल आय डी अद्यावत करावे

 अकोला, दि.12(जिमाका)- अन्न व्यावसायिक तसेच अन्न औषध प्रशासन विभाग यांच्यातील माहिती आदान प्रदानासाठी तयार करण्यात आलेल्या फोस्कॉस प्रणालीवर अन्न व्यावसायिकांनी आपले मोबाईल क्रमांक व ई- मेल आयडी हे अद्यावत करावे,असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.

 यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दिले जातात. बऱ्याच वेळा ऑनलाईन अर्ज करताना मोबाईल क्रमांक व ई मेल आय डी हा स्वतः चा न देता इतर व्यक्तींचा दिलेला असतो. काही वेळा मोबाईल क्रमांक व मेल आय डी बदललेला असतो. अशा परिस्थितीत प्रशासन व अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांनी पाठवलेल्या सूचना, नोटीस, नोटिफिकेशन व्यापाऱ्यांपर्यंत पोचत नाहीत; त्यामुळे कायदेशीर पेच उद्भवतात. तसेच कायद्यात व नियमात झालेले बदल व नवीन तरतुदी यांची माहिती व्यापाऱ्यांना मिळत नाही. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व मेल आय डी अद्यावत करून घ्यावेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन अकोला कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. अर्जासोबत परवाना /नोंदणी प्रमाणपत्राची व आधार कार्ड ची प्रत जोडावी. अन्न व्यावसायिकांचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्यांची माहिती अद्यावत करण्यात येईल, त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज