पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील उपक्रम: उद्यापासून(दि.14) पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाडा

 अकोला, दि.12(जिमाका)- जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्‍पनेतुन स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त जिल्ह्यातील 75000 बेरोजगार युवक/युवतींची नोंदणी करण्यासाठी दि.14 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) ते दि.1 मे (महाराष्‍ट्र दिन) या कालावधीत  ‘पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाडा' अर्थात  आपल्‍या गावातच करा रोजगार नोंदणी' राबविण्‍यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी आपली नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

 या उपक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत,नगरपरिषद,महानगरपालिका क्षेत्रात रोजगार नोंदणी केंद्र निर्माण करण्‍यात आले आहेत. त्या केंद्रावर बेरोजगार युवक/युवती यांना आपल्‍या गावातच रोजगार नोंदणी करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. नोंदणीसाठी रोजगार नोंदणी प्रपत्र तयार करण्‍यात आले आहे. त्यात-

प्रपत्र-1- यामध्‍ये  शासकीय/खाजगी नोकरी करीता इच्‍छुक युवक/युवतींनी आपली माहिती भरुन द्यावयाची आहे. शासकीय नोकरी मिळविण्‍यासाठी आवश्‍यक असलेले स्‍पर्धा परीक्षा प्रशिक्षण,पोलीस भरती/सैन्‍य भरती याकरीता आवश्‍यक असलेले प्रशिक्षण मिळविण्‍याकरीता आपली माहिती भरुन द्यावयाची आहे.

प्रपत्र-2- यामध्‍ये स्‍वयंरोजगार/स्‍वत:चा उद्योग करण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या युवक/युवतींनी त्‍यांना आवश्‍यक स्‍वयंरोजगार/उद्योग/ व्‍यवसाय याबाबत सर्व माहिती भरुन द्यावयाची आहे.

प्रपत्र-3- यामध्‍ये ज्‍या नागरीकांना कृषी व कृषी पुरक उद्योग/व्‍यवसाय/साहित्‍य, तसेच विविध कृषी विषयक योजना यांचा लाभ हवा असल्‍यास त्‍याकरीता त्‍यांनी या प्रपत्रामध्‍ये सर्व माहिती भरुन द्यावयाची आहे.

 याप्रकाराची प्रपत्र प्रत्‍येक ग्रामपंचायत/नगरपरीषद/महानगरपालीका या ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. तेथे बेरोजगार युवक/युवती यांनी आवश्‍यक माहिती भरुन रोजगार नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा एक डाटाबेस तयार करण्‍यात येत असून त्‍यानंतर बेरोजगारांनी नोंदणी केल्‍यानुसार आवश्‍यकतेप्रमाणे रोजगार मिळवण्‍याकरीता आवश्‍यक प्रशिक्षण/व्‍यवसायाकरीता विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच कृषी विषयक क्षेत्रात रोजगार इच्‍छुक असलेल्‍या लोकांना कृषी विषयक योजनांचा लाभ या सर्व बाबींचा समन्‍वयातून रोजगार निर्मिती साठी एक कृती आराखडा तयार करण्‍यात येत आहे. हे अभियान आयुक्‍त,महानगरपालिका,अकोला, जिल्ह्यातील सर्व संबंधित मुख्‍याधिकारी, नगर परिषद, सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व संबंधित ग्रामस्‍तरावरील क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सहकार्याने व समन्‍वयातून राबविण्‍यात येत आहे. याकरीता उमेद अभियानातील गाव स्‍तरावरील कॅडरचे देखील सहकार्य घेण्‍यात येत आहे. तरी जिल्ह्यातील इच्‍छुक बेरोजगार युवक/युवतींनी रोजगार नोंदणी करावे, असे आवाहन ओमप्रकाश उर्फ बच्‍चु कडू पालकमंत्री अकोला जिल्‍हा यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ