भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह : आज (दि.14) प्रभातफेरी

 अकोला दि.13(जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सप्ताहाअंतर्गत गुरुवार दि.14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी सात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ही प्रभात फेरी निघणार असून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गे अशोक वाटिका येथे प्रभात फेरीचा समारोप होईल. तेथे पोलीस बॅंड पथकाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन प्रभात फेरीचा समारोप होईल, या उपक्रमात सहभागाचे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ