महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील बालकांना जतंनाशक गोळ्याचे वितरण

 


             अकोला दि.26(जिमाका)- राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत  जिल्ह्यातील 1 ते 19 वर्ष वयोटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळया देण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बालगृह व शिशुगृहातील बालकांचे आजारांपासुन संरक्षण व्हावे याकरीता कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सोमवार दि.25 रोजी जंतनाशक गोळयांचा वाटप करण्यात आले, अशी माहिती  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

            बालकांमध्ये परजीवी जंतापासुन आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. दुषीत मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजपणे होण्याची शक्यता असते. परीणामी कुपोषण,  रक्ताक्षय, पोट दुखने, भुक कमी होणे, शौचामध्ये रक्त पडणे, अतिसार आणि विविध समस्या मुलांमध्ये दिसुन येतात. याकरीता बालकांचे या आजारापासून संरक्षण होण्याकरीता आरोग्य विभागामार्फत पात्र वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळयांचे वितरण करण्यात आले. तसेच गोळया सेवण कसे करावे या बाबत माहीती उत्कर्ष शिशुगृहांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर नागे यांनी दिली.

जिल्ह्यात चार बालगृह कार्यरत असुन या बालगृहात सहा ते 18 वर्ष वयोगटातील 110 बालके व शिशुगृहात शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील 17 शिशु प्रवेशीत आहेत.  बालगृहात जंतनाशक गोळया वितरणाचा उपक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, कापशी प्राथमीक आरोग्य केंद्राचे  डॉ.मनिषा वाघमारे, कल्पना नाईक, गायत्री बालीकाश्रमच्या वैशाली भटकर, भाग्यश्री घाटे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, शासकीय बालगृहांच्या जयश्री वाढे यांनी मौलाचे सहकार्य केले. 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ