मौजे शेळद येथे अनधिकृत वीट भट्टी नष्ट

 



अकोला,दि.२०(जिमाका)- मौजे शेळद ता.बाळापूर येथे सुरू असलेल्या एका अनधिकृत वीट भट्टीस आज महसुल यंत्रणेने जेसीबी यंत्राद्वारे नष्ट करण्यात आले. यासंदर्भात महसूल सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापुर तहसील कार्यक्षेत्रातील मौजे शेळद येथील गट क्रमांक 2 मध्ये निरंजन कळस्कार नामक व्यक्ती अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीकडे वीटभट्टी व्यवसाय करण्याकरिता कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, जेसीबीद्वारे वीटभट्टी नष्ट करण्यात आली. या कार्यवाही प्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीमती प्रणिता चापले, तहसिलदार बाळापुर सय्यद शेख, मंडळ अधिकारी पारस दीपक सोळंके, तलाठी सचिन खंडारे या कार्यवाही दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या कामानिमित्त बाळापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचा बंदोबस्त उपस्थित होता. तसेच जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचे कर्मचारीही उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ