जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कोरोनाचे सर्व निर्बंध मागे


             अकोला दि.1(जिमाका)-  जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून  दैनंदिन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी होत आहे. तसेच महसूल व वन विभाग, मदत पूनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार शुक्रवार दि.1 एप्रिल पासून कोरानाच्या सर्व निर्बंध मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

आदेश याप्रमाणे :

१.      आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५, साथरोग अधिनियम- १८९७  अंतर्गत  कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्‍यात आलेले निर्बंधाबाबतचे  व सद्या अंमलात असलेले सर्व आदेश याद्वारे मागे घेण्यात येत आहेत.

२.      कोविड-१९ संदर्भाने निर्बंधाबाबतचे यापूर्वी  काढण्‍यात आलेले विविध आदेश हे दि. १ एप्रिल २०२२ च्या  रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार नाहीत.

३.      सर्व नागरिक, आस्थापना आणि संस्थांना सूचित करण्यात येते की, कोविड या विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये या करिता लसीकरण करुन घ्‍यावे तसेच  मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तनाचे पालन करणे गरजेचे असल्‍यामुळे हे सुरू ठेवावे,  कारण हेच व्यक्तींच्या तसेच समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठे रक्षण आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ