हेल्मेट वापराबाबत जनजागृती रॅली;उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाचा उपक्रम

 







अकोला दि.12(जिमाका)-  येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस रवाना करण्यात आले. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची यावेळी उपस्थिती होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्णा या मुख्य प्रवेशद्वारापासून सकाळी साडेआठ वाजता ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपप्रादेशीक परिवहन कार्यालय  तसेच अन्य शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीतील प्रत्येक दुचाकीस्वार महिला पुरुषाने हेल्मेट परिधान केलेले असल्याने या रॅलीने शहरावासियांचे लक्ष वेधून घेतले. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ