'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम
अकोला , दि. 30 (जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले होते. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता दि. 15 मेचे सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदेश निर्गमित केले. 1. मद्यविक्री - जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये मद्यविक्री संदर्भाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार अंशतः बदल करुन पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. अक्र तपशिल कालावधी १ मद्य विक्री नमूना FL-2 ,FL/BR-II, Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद ...